Pimpri News : उपायुक्त संदीप खोत यांच्याकडे शिक्षण, आरोग्य; अण्णा बोदडे यांच्याकडे पुन्हा माहिती जनसंपर्क विभाग

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील उपायुक्त, सहायक आयुक्तांच्या कामकाजात फेरबदल करण्यात आले आहेत. शिक्षण, आरोग्य या प्रमुख दोन विभागांची जबाबदारी उपायुक्त संदीप खोत यांच्याकडे तर ‘क’ क्षेत्रीय अधिकारीपदासह माहिती जनसंपर्क विभागाचा कार्यभार सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याबाबतचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी काढले आहेत.

घनकचरा व्यवस्थापन निर्मल अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, कचरा विलगीकरण आणि घनकच-याचे परिणामकारक व्यवस्थापक व सनियंत्रण करणे या महत्त्वपुर्ण कामांसाठी उपायुक्त दर्जाच्या अधिका-याची नेमणूक करण्यात आली आहे. या कामी क्रीडा विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांची निवड करण्यात आली आहे.

आरोग्य (घनकचरा व्यवस्थापन) विभागासह शिक्षण (प्राथमिक / आरोग्य) विभागाचीही जबाबदारी खोत यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांना विभागप्रमुख म्हणून घोषित करण्यात आले आहे.

सहायक आयुक्त निलेश देशमुख यांच्याकडील माहिती जनसंपर्क विभागाचा कार्यभार काढून घेत त्यांच्याकडे आकाशचिन्ह व परवाना विभाग व पशुवैद्यकीय विभाग सोपविण्यात आला आहे. ‘क’ प्रभागाचे क्षेत्रिय अधिकारी अण्णा बोदडे यांना झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागासह दिव्यांग कक्ष, माहिती व जनसंपर्क विभागाचे सहायक आयुक्त म्हणून पदभार देण्यात आला आहे.

सहायक आयुक्त सुषमा शिंदे यांची क्रीडा विभाग, विजयकुमार थोरात यांची ‘ह’ क्षेत्रिय कार्यालय आणि अभिजीत हराळे यांची करसंकलन विभागात बदली करण्यात आली आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.