Pimpri News : भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत सिंचन पुनर्स्थापना खर्च माफ करा

आमदार महेश लांडगे यांची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज – भामा आसखेड धरणाचे पाणी पिंपरी-चिंचवड शहरात आणले जात आहे. पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत सिंचन पुनर्स्थापना खर्च माफ करून त्याबाबत शासन निर्णय काढण्यात यावा, अशी मागणी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली.

राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने 27 ऑगस्ट 2020 रोजी एक शासन निर्णय पारित केला आहे. एकूण परिगणित सिंचन पुनर्स्थापनेच्या खर्चापैकी भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांसाठी पुणे महापालिकेने केलेल्या पुनर्वसन खर्च वजा करून उर्वरित रक्कम सिंचन पुनर्स्थापनेचा खर्च म्हणून पुणे महापालिकेकडून आकारण्यात यावी, असे या शासन निर्णयानुसार सांगण्यात आले आहे.

त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी देखील शासन निर्णय होणे आवश्यक आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका भामा आसखेड धरण पाणी पुरवठा प्रकल्पांतर्गत सिंचन पुनर्स्थापना खर्च माफ करण्याबाबतचा शासन निर्णय जलसंपदा विभागाकडे प्रलंबित असून तो शासन निर्णय मंजूर करावा, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.