Pimpri News: पार्किंगमध्ये खेळत असलेल्या सात वर्षाच्या मुलीसोबत अश्लील चाळे

एमपीसी न्यूज – गृहनिर्माण सोसायटीच्या (Pimpri News) पार्किंगमध्ये खेळत असलेल्या सात वर्षीय मुलीशी 42 वर्षाच्या पुरुषाने अश्लील चाळे केले. ही घटना सोमवारी (दि. 13) रात्री साडेनऊ वाजता पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी जोएल एलिक हर्बर्ट (वय 42, रा. वैभवनगर, पिंपरी) याच्याविरोधात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडीत मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Hinjwadi News: चार जणांच्या टोळक्याने तरुणाला केली लोखंडी रॉडने मारहाण, 22 टाके पडले

फिर्यादी यांची सात वर्षाची मुलगी गृहनिर्माण सोसायटीतील इमारतीच्या पार्किंग समोर सायकल खेळत होती. खेळत असताना तिच्या सायकलला कुत्रे आडवे आले. त्यामुळे मुलगी घाबरून एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये गेली. तिथे असलेल्या आरोपी जोएल याने मुलीला त्याच्याकडे बोलावून घेतले. तिच्यासोबत अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस (Pimpri News) अधिक तपास करत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक स. द. पलांडे यांनी सांगितले, कि आरोपी हर्बर्ट याला 15 जूनला सकाळी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी हर्बर्ट विरोधात भादविक कलम 354, 354(अ), लैंगिक अपराधपासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.