PDFA LEAGUE : डेक्कन इलेव्हन, सिटी गर्ल्सचा चुरशीचा विजय

एमपीसी न्यूज – डेक्कन इलेव्हन आणि सिटी गर्ल्स गो स्पोर्ट्स यांनी पीडीएफए महिला लीग (PDFA LEAGUE) चुरशीचे विजय मिळवून आपली आगेकूच कायम राखली.

एसएसपीएमएस मैदानावर झालेल्या सामन्यात (PDFA LEAGUE) डेक्कन इलेव्हनने उत्कर्ष क्रीडा मंच (यूकेएम) ‘अ’ संघाचा 1 – 0 असा पराभव केला. सामन्यातील एकमात्र महत्त्वाचा गोल कल्याणी देसलेने 33व्या मिनिटाला केला.

त्यानंतर सिटी गर्ल्स गो स्पोर्ट्सने उत्कर्ष क्रीडा मंच ब संघाला 2 – 1 अशा फरकाने हरवले.

School Open: मुलांच्या किलबिलाटाने पुन्हा एकदा शाळा गजबजल्या  

 

रितू फ्रान्सिस आणि सुहाना चौधरी (27वे) यांनी विजयी संघाकडून गोल केले, तर गार्गी कामठेकर (34 वें) हिने पराभूत संघाकडून गोल केला.

निकाल

एस एस पी एम एस मैदान महिला लीग

गट ब: डेक्कन इलेव्हन: 1 (कल्याणी देसले 33वे) वि.वि उत्कर्ष क्रीडा मंच ‘अ’: 0

गट -अ: सिटी गर्ल्स गो स्पोर्ट्स: 2 (रितू फ्रान्सिस 8वे; सुहाना चौधरी 27वे) वि.वि उत्कर्ष क्रीडा मंच ‘ब’: 1 (गार्गी कामठेकर 34वे)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.