Pimpri News : कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांना ‘वात्सल्य योजना’ लागू करा – आमदार लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज – कोरोना काळात आई-वडील गमावलेल्या अनाथ मुलांसाठी ‘वात्सल्य योजना’ लागू करा, अशी मागणी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्य सरकारकडे केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी निवेदनात असे म्हटले आहे की, कोरोना सारख्या आपत्तीमुळे अनाथ झालेल्या लहान मुलांना शासनाने ‘वात्सल्य योजने’ अंतगर्त मोफत शिक्षण व वयाच्या 18 वर्षापर्यंत दरमहा पाच हजार रुपये आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील अनाथ मुलांना मोफत शिक्षण व आर्थिक मदत देणेबाबत शासनाने तातडीने उपाययोजना करणेबाबत संबंधितांना योग्य कार्यवाहीचे आदेश द्यावेत. असे आमदार लक्ष्मण जगताप यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.