Pimpri news: आज दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना अनेक नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

 एमपीसी न्यूज -चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी राज्यातील अनेक नेत्यांनी आज  (दि. 10) त्यांच्या पिंपळेगुरव (Pimpri news) येथील निवासस्थानी भेट दिली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अनिल बोंडे, खासदार व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस, आमदार भीमराव तापकीर, संतोष दानवे, प्रकाश आबिटकर, ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

 

Moshi News : चिखलीत नव्हे मोशीत होणार 850 खाटांचे रुग्णालय, खर्च 214 कोटीवरुन 450 कोटींवर

आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे 3 जानेवारी रोजी निधन झाले. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप  यांचे सर्वपक्षीय आणि सर्व क्षेत्रातील मान्यवरांसोबत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर सर्वपक्षीय नेते, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. हे सर्वजण त्यांच्या पिंपळेगुरव (Pimpri news) येथील निवासस्थानी येऊन कुटुंबियांचे सांत्वन करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.