रविवार, सप्टेंबर 25, 2022

Pimpri News : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांना मनसेचा ‘कला गौरव पुरस्कार’

एमपीसी न्यूज – अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 2021 चा ‘कला गौरव पुरस्कार’ देण्यात आला. कर्तव्यदक्ष महिला म्हणून त्यांचा मनसेच्यावतीने गौरव करण्यात आला.

जागतिक महिला दिन आणि मराठी राज भाषा दिनानिमित्त स्वराज्य रक्षक छत्रपती  संभाजी महाराज मालिकेतून घराघरात पोचलेल्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांचा गौरव करण्यात आला. प्राजक्ता गायकवाड यांनी या मालिकेत महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली होती.

यावेळी मनसे चित्रपट सेनेचे शहराध्यक्ष  दत्ता घुले, उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, उपाध्यक्ष दीपक  भालेराव, सचिव शिवनाथ दिलपाक, प्रणव आसरे, वैजेनाथ डोपरे, सुरज लोणकर, शिवशंकर पाचपोर आदि उपस्थित होते.

spot_img
Latest news
Related news