Pimpri News : गौरी-गणपती सणानिमित्त वल्लभनगर आगारातून ज्यादा बसेस

एमपीसी न्यूज  – गौरी-गणपती सणानिमित्त पिंपरी-चिंचवडच्या वल्लभनगर येथील एसटी आगारातून 7 ते 9 सप्टेंबर दरम्यान कोकणासाठी नऊ जादा बसेस  धावणार आहेत. ज्यादा बसचे नियोजन आगार प्रशासनाच्या वतीने करण्यात आले असल्याचे वल्लभनगर स्थानक प्रमुख गोविंद जाधव यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मोठ्या संख्येने कोकणवासीय वास्तव्यास आहेत. यामुळे कोकण परिसरामध्ये आगारातून सुमारे 25 टक्के बसेस सोडण्यात येतात.  कोकणवासियांची गौरी-गणपती सण  आपल्या मूळगावी साजरा करण्याची प्रथा आहे.  यामुळे या सणादरम्यान कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. यामुळे वल्लभनगर आगाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी जादा बसेसची नियोजन करण्यात आले आहे.

यामध्ये चिपळूण, दापोली, देवरुख, गुहागर, खेड, महाड, रत्नागिरी या ठिकाणी बसेस 7 ते 9 सप्टेंबर दरम्यान धावणार आहेत. तसेच किमान 40 प्रवाशांचा ग्रुप असल्यास त्यांना आपल्या मूळ गावी एसटी उपलब्ध करून दिली जाणार आहे.  ज्यादा बसेसचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वल्लभनगर आगर प्रशासनाने  केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.