Alandi Crime News : मोटरसायकल घसरुन एकाचा मृत्यू 

एमपीसी न्यूज – मोटरसायकल घसरुन 55 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे. मरकळ आळंदी रोडवर पॉलीबॅन्ड कंपनीसमोर गुरुवारी (दि.12) हा अपघात झाला. 

कलप्पा अप्पया कुंभार (वय 55, रा. शिंदेआळी, पिंपरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी गणेश शंकर गाडेकर (वय 50, रा. शास्त्रीनगर, पिंपरी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कलप्पा कुंभार यांनी आपली दुचाकी (एम एच सीबी 9156) भरधाव वेगाने चालवत असताना तिचा घसरुन अपघात झाला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला तर, गणेश शंकर गाडेकर यांना गंभीर दुखापत झाली आहे. आळंदी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.