Pimpri News: शहरात सलग दुसऱ्या दिवशी दोनशेच्या पुढे रुग्ण; आज 220 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील दोनशेच्या आतमध्ये आलेले कोरोनाची रुग्णसंख्या कालपासून दोनशेच्या पुढे जाऊ लागली आहे. शहरात आज (शुक्रवारी)220 नवीन रुग्णांची नोंद झाली. गुरुवारी 216 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. सलग दुस-यादिवशी दोनशेहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे चिंता वाढू लागली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात फेब्रुवारीच्या मध्यापासून पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. कोरोनाची दुसरी लाट तीव्र होती. या लाटेत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. मृत्यूचे प्रमाणही प्रचंड होते. जूनमध्ये दुसरी लाट ओसरली. रुग्णसंख्या नियंत्रणात आली. शहरातील नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या आतमध्ये होती. परंतु, गुरुवारपासून सलग दुस-यादिवशी दोनशेहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

शहरातील 3 आणि महापालिका हद्दीबाहेरील 1 अशा 4 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 354 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 65 हजार 613 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 878 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 265 रुग्ण गृहविलगीकरणात असून 613 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 48 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 432 आहेत. आज दिवसभरात 10 हजार 621 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 11 लाख 51 हजार 545 जणांनी लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.