Pimpri news: महापालिकेतर्फे खासगी रुग्णालयांना 48 व्हेंटिलेटर; रुग्णांकडून नियमित दराच्या पन्नास टक्के दर आकारण्याची सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे कंपन्यांच्या ’सीएसआर’ फंडमधून व्हेंटिलेटर उपलब्ध झालेले आहेत. ते तातडीने सुरु करता येण्यासाठी ऑक्सिजन पाइपलाइन सुविधा असलेल्या रुग्णालयांना तात्पुरत्या आणि अटी-शर्तीवर दिले आहेत. त्यांची देखभाल आणि दुरुस्ती रुग्णालयांनी करावयाची आहे. महापालिकेच्या वॉररुममध्ये नोंद झालेल्या रुग्णांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. हे व्हेंटिलेटर लावलेल्या रुग्णांकडून नियमित दराच्या पन्नास टक्के दर आकारण्याची सूचना महापालिकेने केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिवसाला दोन हजारहून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहे. वाढत्या रुग्णांमध्ये गंभीर, अतिगंभीर रुग्णांचा समावेश आहे. त्यांना उपचारासाठी आवश्यक असलेल्या व्हेंटिलेटर बेडची मोठी कमतरता जाणवत होती. बेड उपलब्ध नव्हते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने व्हेंटिलेटर बेड वाढविण्यावर भर दिला. महापालिकेमार्फत वैद्यकीय व्यवस्था व इतर सर्व व्यवस्था पुरविण्याचे काम चालू आहे. सद्यस्थितीत महापालिकेला सीएसआर अंतर्गत 48 व्हेंटिलेटर्स मिळाले आहेत.

खासगी रुग्णालयांना दिलेले व्हेंटिलेटर –

रुग्णालय व्हेंटिलेटर     संख्या
डॉ.डी.वाय.पाटील          10
लोकमान्य हॉस्पिटल      5
(निगडी)
लोकमान्य हॉस्पिटल
(चिंचवड)                     3
स्टार हॉस्पिटल
(आकुर्डी)                      5
आदित्य बिर्ला                5
अकॉर्ड हॉस्पिटल
(भोसरी)                       4
निरामय हॉस्पिटल
(चिंचवड)                      5
ब्रम्हचैतन्य हॉस्पिटल      5
स्टर्लिंग हॉस्पिटल
(आकुर्डी)                       4
ओजस हॉस्पिटल            2
(रावेत)

असे एकूण 48 व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयांना दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.