Pimpri News: महापालिका कोरोना सेंटरसाठी पीपीई कीट, मास्क खरेदी करणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची विविध रूग्णालये, कोरोना केअर सेंटर येथील कोरोना बाधित रूग्णांवरील उपचारासाठी पीपीई कीट आणि एन 95 मास्क साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी 81 लाख रूपये खर्च होणार आहे.

कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी महापालिकेकडून आवश्यक ती दक्षता घेण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बाधित रूग्णांवर महापालिकेची विविध रूग्णालये, कोरोना केअर सेंटर या ठिकाणी उपचार करण्यात येत आहेत.

कोरोना बाधित रूग्णांवर उपचार करताना आवश्यक असणारे पीपीई कीट आणि एन 95 मास्क असे साहित्य खरेदी करण्यात येते. हे साहित्य तातडीने उपलब्ध करून मिळण्यासाठी वैद्यकीय विभागामार्फत मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने पीपीई कीट आणि मास्क खरेदी करण्यासाठी निविदा मागविण्यात आली होती.

या निविदा प्रक्रीयेमध्ये नऊ निविदा धारकांनी भाग घेतला. त्यामध्ये पारस डाईंग अ‍ॅण्ड प्रिटींग मिल्स यांनी प्रति कीट 162 रूपये अधिक जीएसटी असा लघुत्तम दर सादर केला.

या खरेदीसाठी अंदाजित रक्कम 97 लाख रूपये अपेक्षित धरण्यात आली आहे. पारस डार्इंग यांनी 81 लाख रूपये दर सादर केला आहे. हा दर अंदाजित दरापेक्षा 16.49 टक्क्याने कमी आहे. त्यानुसार, त्यांच्यासमवेत करारनामा करण्यात येणार आहे.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.