Pimpri News: महापालिका स्थायी समितीची सभा पुन्हा तहकूब

0

एमपीसी न्यूज – बोगस एफडी प्रकरण आणि रावेत येथील कोविड केअर सेंटरला पैसे देण्यावरुन स्थायी समिती सदस्यांमध्ये बिनसले आहे. यातील अर्थकारण जुळून येत नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची तहकूब सभा आज पुन्हा एकदा गणसंख्येचे कारण पुढे करत पुन्हा तहकूब करण्यात आली. आता ही सभा बुधवारी (दि.13) ठेवण्यात आली आहे.

बोगस एफडीआर दिलेल्या ठेकेदारांवरील करवाईवरून बुधवारची (दि.6) स्थायी समितीची सभा तहकूब करण्यात आली होती. महापालिका मुख्यालयात उपस्थित असतानाही सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी, शिवसेनेचे सदस्य सभागृहात आले नव्हते.

सभागृहात असलेल्या एकमेव अध्यक्षांनी सभा गणसंख्येचे कारण देत आज (शुक्रवार) पर्यंत तहकूब केली होती. ही तहकूब सभा आज शुक्रवारी होती. मात्र, आजही तीनच सदस्य सभेसाठी आले होते. त्यामुळे आजची सभाही गणसंख्या नसल्याने तहकूब करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, भाजपमधील एक गटाच्या नेत्याने सभा होऊ नये, असा आदेश आपल्या सदस्यांना दिल्यानेच ही सभा तहकूब करण्यात आल्याची जोरदार चर्चा महापालिकेत वर्तुळात रंगली आहे.

याबाबत  स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे म्हणाले, ”विषयपत्रावर जास्त विषय नव्हते. कार्योत्तर मान्यतेचे विषय होते. स्थायी समितीचे अनेक सदस्य सभेला उपस्थित नव्हते. त्यामुळे आजची सभा गणसंख्येअभावी तहकूब करण्यात आली. ही सभा आता बुधवारी घेण्यात येणार आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.