Pimpri News: नाना काटे सोशल फाऊंडेशनतर्फे पूरग्रस्त नागरिकांसाठी जीवनोपयोगी वस्तुंचा एक ट्रक रवाना

एमपीसी न्यूज – नाना काटे सोशल फाऊंडेशनतर्फे एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत निसर्गाच्या संकटाला धैर्याने तोंड देणाऱ्या कोकणामधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांना अन्नधान्य व जीवनोपयोगी वस्तुंची मदत पाठविली. वस्तु घेवुन ट्रक चिपळूणच्या दिशेने रवाना करण्यात आला.

या प्रसंगी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, राज कोठारी, अविनाश गायकवाड, प्रशांत देवकाते, कुंदन कातुरे, शाहरूख शेख आदी उपस्थित होते.

निसर्ग सौंदर्य लाभलेल्या कोकणाला अतिवृष्टीने झोडपले. त्यामुळे कोकणवासीयांचे अतोनात नुकसान झाले. या संकटाला धैर्याने तोंड देत आहेत. या नागरिकांना जीवनावश्क वस्तूच्या माध्यमातून नाना काटे सोशल फाउंडेशन तर्फे मदत करण्यात आली. या वस्तु घेऊन ट्रक चिपळूणच्या दिशेने रवाना करण्यात आला. ही मदत चिपळूणचे जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात येणार असल्याचे नगरसेवक नाना काटे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.