Pimpri News : नृत्य कला मंदिर आयोजित नृत्य महोत्सव उत्साहात ; अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती
एमपीसी न्यूज – नृत्य कला मंदिर आणि नृत्य तेज अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाइन नृत्य महोत्सव उत्साहात पार पडला, या महोत्सवासाठी अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. फेसबुक व युट्युब वरुन या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसारण करण्यात आले. शुक्रवारी (दि.30) ऑनलाईन पद्धतीने हा महोत्सव पार पडला.
यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांनी नृत्य कला मंदिर तसेच नृत्यतेज अकॅडमीच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. कृतिका पद्मनाभन या ॲम्स्टरडॅम युरोप येथून या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या त्या नृत्य कला मंदिर च्या 1995 च्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थिनी आहेत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच लगान चित्रपटातील राधा कैसे न जले या नृत्य सादर केले. झी वाहिनीवरील एकापेक्षा एकचा महा विजेता मयुरेश पेम यांनी आपल्या स्मरणातील नृत्य शिबिर तसेच तेजश्री अडीगे यांच्या आणि नृत्यकला मंदिर यांच्या आठवणी सांगून आपले मनोगत व्यक्त केले. तसेच, तेजश्री अडीगे यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या नृत्य प्रवासास मोलाची मदत झाल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. संस्थेच्या 2010 च्या विशारद कोर्स मधील विद्यार्थिनी रुचली बोरोले आणि संस्कृती मगदूम यांनी ही गणेश वंदना सादर केली. 1996/97 बॅजच्या विद्यार्थिनी मीनाक्षी विवेक यांनी सरस्वती वंदना सादर केली. 2003-04 बॅजच्या ऋतुजा देशेट्टी, मैत्रेयी मोकाशी व स्वरुपा इनामदार यांनी ‘त्रिमूर्ती कौतूकम’ ही रचना सादर केली.
21 ते 28 एप्रिल या आठ दिवसीय नृत्य शिबिरात राजस्थानी व लावणी नृत्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये 9 ते 15 वयोगटातील विद्यार्थिनींनी ‘मेरा असी कली का लेंगा’ या राजस्थानी घुमर नृत्यावर ठेका धरला. या नृत्यात मुलींबरोबर त्यांच्या आईनेही सहभाग घेतला होता. 15 ते 20 वयोगटातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोकप्रिय लावणी नृत्यावर आपली अदाकारी सादर केली.
यानंतरच्या नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांना श्रध्दांजली अर्पण करत हिंदी चित्रपटातील लोकप्रिय नृत्यांवर दहा वर्षाखालील बालकांनी ताल धरला. दहा ते पंधरा वयोगटातील विद्यार्थिनींनी अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रीत केलेल्या नृत्यावर ठेका धरला. 16 हे वर्षांवरील विद्यार्थ्यांनी अभिनेत्री करीना कपूर च्या गाजलेल्या गाण्यांवर नृत्य सादर केले.
या महोत्सवात पुढे अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि नृत्य दिग्दर्शिका सरोज खान या जोडीने गाजवलेली सिने नृत्य सादर करण्यात आली. यावेळी तेजश्री अडीगे यांनी सह-नृत्यदिग्दर्शन केलेल्या ‘हमको आजकल है इन्तजार’ या मनाली गोवंडे कानिटकर यांनी ठेका धरला. तसेच, सुप्रिया धाईंजे, डान्स महाराष्ट्र डान्सचा विजेता पुण्यकर उपाध्याय यांनी नृत्य सादर केली. तेजश्री अडीगे यांच्या देवदास चित्रपटातील फ्युजन नृत्यानी कार्यक्रमाची सांगता झाली.
महोत्सवात पुढे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये
– उत्कृष्ट बालकलाकार : सृष्टी कानोजिया, पुण्यकर उपाध्याय यांच्या वतीने हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
– उत्कृष्ट युवा कलाकार : सुपर्णा श्याम, प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी हा पुरस्कार जाहीर केला.
– उत्कृष्ट नृत्य प्रशिक्षक : योगेश देशमुख, नृत्यदिग्दर्शक नंदकिशोर कपोते यांच्या वतीने हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
– शास्त्रीय नृत्य आणि अभिनय यात विशेष कामगिरी केल्याबद्दल अभिनेत्री शर्वरी जमेनिस यांना अश्विनी पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार गुरु डॉ. सुचेता चापेकर यांच्या वतीने जाहीर करण्यात आला.
चापेकर यांनी ऑनलाईन उपस्थिती लावत नृत्य कला मंदिर आणि नृत्य तेज अकॅडमीच्या वाटचालीला भरभरून आशीर्वाद दिले तसेच, शर्वरी जमेनिस हिच्या योग्य निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या.
– नृत्य कला मंदिर तर्फे लोकनाट्य व नृत्य कलाकार प्रमिलाताई शिंदे यांना आर्थिक मदत म्हणून 11 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.
नृत्य तेज अकॅडमी तर्फे गेली वीस वर्ष हे शिबीर सातत्याने घेतले जाते असून, भारतातील पारंपरिक लोककला, लोकनृत्याचे सर्वांना प्रशिक्षण मिळावे हाच याचा उद्देश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नकारात्मक विचार आणि तणावपूर्ण वातावरणात आनंद देण्याकरिता ऑनलाईन पध्दतीने महोत्सव साजरा करण्यात आला. सर्व कलाकार विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याचे व्हिडिओ घरातूनच पाठवले, यामध्ये देशा-विदेशातील विद्यार्थी सहभागी झाले होते. केदार गोडबोले यांनी सर्व व्हीडिओ संकलित केले.
कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता दिपक पागे, उमा पाटील व अमृता काकडे यांनी सहकार्य केले. तर, विवेक इनामदार, प्रमोद एकबोटे, नंदकिशोर कपोते, स्वाती दैठणकर, मयुरेश पेम आणि मीरा जोशी यांनी पुरस्कार समितीचे काम पाहिले. कार्यक्रमाचे निवेदन नृत्य कला मंदिरच्या संचालिका व नर्तिका अभिनेत्री तेजश्री अडीगे यांनी केले.