Pimpri news: वायसीएम रुग्णालयात उभारलेल्या 20 केएल ऑक्सिजन टँकला राज्य सरकारची परवानगी

वायसीएम रुग्णालयासाठी एकूण 30 केएल ऑक्सिजन आयसीयुसाठी उपलब्ध होणार आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोविड-19 रुग्णांसाठी ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून वायसीएम रुग्णालयात नव्याने उभारण्यात आलेल्या 20 केएल ऑक्सिजन टँकला ( 20 हजार किलो लिटर) शासनाकडून परवानगी मिळाली आहे. यामुळे वायसीएम रुग्णालयासाठी यापुर्वीच्या 10 केएल व नविन 20 केएल असा एकूण 30 केएल ऑक्सिजन आयसीयुसाठी उपलब्ध होणार आहे.

वायसीएम रुग्णालयात अधिकचे 125 आयसीयू ऑक्सिजन बेड नव्याने तयार होणार आहेत. पुढील 2 ते 3 दिवसात हे काम पुर्णत्वास येणार आहे. रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यावर 30 हायफ्लो ऑक्सिजनचे एचडीओ युनिटही तयार करण येणार आहे.

वायसीएम रुग्णालयामध्ये मुबलक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध होण्यासाठी रुग्णालयाच्या परिसरात नव्याने 20KL ऑक्सिजन टँकची उभारणी करण्यात आली होती. त्याला मंजुरी मिळाली असून त्याचा फायदा शहरातील रुग्णांना होणार आहे.

या ऑक्सिजन टँक प्रकल्पाच्या निर्मितीमुळे रुग्णालयामध्ये कायमस्वरुपी ऑक्सिजन/ आयसीयू बेडसाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे.

तसेच यापूर्वी रुग्णालयात जम्बो सिलेंडरमार्फत होणारा ऑक्सिजन पुरवठा आता टँकद्वारे होणार असल्याने जम्बो सिलेंडर राखीव राहणार असल्याची माहिती सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.