Pimpri News: दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानी द्या, व्यापाऱ्यांची महापौर, आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या घटत चालली आहे. पिंपरी कॅम्पातील सर्व दुकांनदारांनी स्वत: व कर्मचाऱ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घेतले. त्यामुळे कॅम्पातील व्यापारी दुकाने आठवड्याचे सातही दिवस रात्री 8 वाजेपर्यंत चालू ठेवण्याची परवानी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.

याबाबत पिंपरी मर्चंट फेडरेशनसह व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज (बुधवारी) महापौर उषा ढोरे, आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली. आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे व्यापाकी वर्गास मोठा फटका बसला आहे. आर्थिक घडी पूर्णपणे विस्कळीत झाली. दुकानाचे भाडे, कर्जाचे हप्ते, कामगारांचे पगार, इतर सरकारी कर, मुलांचा शैक्षणिक खर्च, घरखर्च अशी देणी व्यापाऱ्यांना देणे भागच आहे. त्यातच सातत्याने लागू होत असलेल्या निर्बंधामुळे आर्थिक नुकसान होत आहे.

पिंपरीमधील सर्व दुकानदारांनी स्वत: व कर्मचाऱ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घेतले. पिंपरीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत चालली आहे. त्यामुळे कॅम्पातील व्यापारी दुकाने आठवड्याचे सातही दिवस रात्री 8 वाजेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी द्यावी. राज्यातील अनेक जिल्ह्यांत तशी परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे पिंपरीमध्येही रात्री 8 वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवण्याची परवानगी द्यावी. प्रशासनाने कोरोबाबत घेतलेल्या नियमांचे आम्ही पालन करु अशी ग्वाही व्यापाऱ्यांनी दिली आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.