Pimpri News: आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांना स्वहिस्सा भरण्यासाठी  18 मेपर्यंत मुदतवाढ

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने केंद्र शासन व राज्य शासनाच्या सहकार्याने राबविण्यात येत असणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये लाभार्थी ठरलेल्या व प्रथम स्वहिस्सा रक्कम भरलेल्या चऱ्होली प्रकल्पातील लाभार्थ्यांना 40 टक्के आणि बोऱ्हाडेवाडी प्रकल्पातील पात्र लाभार्थ्यांना 80 टक्के स्वहिस्सा रक्कम भरण्यासाठी पुन्हा महिन्याभराची मुदतवाढ दिली आहे. 18 मेपर्यंत ही मुदतवाढ असणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये चऱ्होली 40 टक्के आणि बोऱ्हाडेवाडी 80 टक्के स्वहिस्सा रक्कम भरण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामध्ये चलन प्राप्त करुन 18 मेपर्यंत स्वहिस्सा रक्कम भरावी. अन्यथा लाभ रद्द करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

या बाबतची माहिती व निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या नावाची यादी झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग 205 व्यापारी संकुलन, भाजी मंडई शेजारी चिंचवडगाव पुणे – या कार्यालयाच्या दर्शनी भागावर नागरीकांकरीता सूचना फलकावर लावण्यात आलेली आहे. 18 मे पर्यंत लाभार्थ्यांनी स्वाहिस्सा रक्कम भरावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.