Pimpri News : महाराष्ट्र वितरक सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी (पिंपरी चिंचवड शहर) रावसाहेब थोरात यांची नियुक्ती

पिंपरी / प्रतिनिधी

शिवसेना प्रणित महाराष्ट्र वितरक सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी (पिंपरी चिंचवड शहर) रावसाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वितरक सेनेचे अध्यक्ष मारुती साळुंखे यांच्या हस्ते थोरात यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

मुंबईतील वडाळा येथील महाराष्ट्र वितरक सेनेच्या राज्यस्तरीय कार्यालयात हे नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र वितरक सेनेचे सरचिटणीस दिलीप ब्राम्हणे, प्रितम उपलप, सारंग घाडगे, अरविंद नाईक, अमोल फरकळे आदी उपस्थित होते.

शिवसेना शिरूर लोकसभा संपर्कप्रमुख नेते शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना पिंपरी चिंचवड शहरप्रमुख योगेश बाबर व शिवसेना मावळ जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांच्या मार्गदर्शनावाखाली रावसाहेब थोरात यांच्यावर महाराष्ट्र वितरक सेनेच्या शहराध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.

त्याचबरोबर महाराष्ट्र वितरक सेना जिल्हा सरचिटणीसपदी (पिंपरी चिंचवड शहर) वैभव छाजेड, जिल्हा खजिनदारपदी (पिंपरी चिंचवड शहर), महेंद्र सिंग शेखावत, जिल्हा उपाध्यक्षपदी गणेश आहेर, गोविंद बालघरे (पिंपरी चिंचवड शहर) आणि जिल्हा चिटणीसपदी बाळासाहेब नाखले (पिंपरी चिंचवड शहर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रावसाहेब थोरात हे चिखली म्हेत्रे वस्ती येथील लढवय्ये कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात, शिवसेना भोसरी विधानसभा संघटक म्हणूनही ते कार्यरत आहेत. महाराष्ट्र वितरक सेनेच्या शहराध्यक्षपदी झालेल्या थोरात यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.

पिंपरी चिंचवड शहरात महाराष्ट्र वितरक सेनेचे जाळे तयार करून शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही थोरात यांनी निवडीनंतर दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.