Swarsagar Festival News : ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर ऑनलाईन पद्धतीने करणार स्वरसागर महोत्सवाचे उद्घाटन  

एमपीसीन्यूज : पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशनच्या वतीने आज (शनिवार, 6 फेब्रुवारी) व उद्या (रविवार, 7 फेब्रुवारी) 22 वा स्वरसागर  महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष जयंत नारळीकर करणार आहेत. शनिवारी सायंकाळी सात वाजता हे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

आजपासून पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात होणा-या  22 व्या स्वरसागर महोत्सवात आपण आपल्या आवडत्या कलाकारांचे गायन, वादन ऐकू शकणार आहोत. यंदाचे विशेष आकर्षण म्हणजे या वेळच्या स्वरसागर महोत्सवात स्वरभास्करांना सांगितिक मानवंदना देण्यात येणार आहे. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून या महोत्सवात त्यांना विशेष स्वरमानवंदना देण्यात येणार आहे.

या स्वरसागर महोत्सवाचे उद्घाटक असलेले ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर हे मागील अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहराशी सायन्स पार्कच्या माध्यमातून जोडलेले आहेत. तसेच पिंपरी चिंचवड तारांगण समितीचे ते सल्लागार देखील आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.