Pimpri News : स्मार्ट सिटीच्या ठेकेदार कंपन्यांना दंडासह सहा महिने मुदतवाढ; संचालक मंडळाची मान्यता

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या पॅन सिटी अंतर्गत काम करणाऱ्या एल अँड टी आणि टेक महिंद्रा या ठेकेदार कंपन्याना दंडासह तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. एल अँड टी कंपनीला 36 लाख, तर टेक महिंद्रा कंपनीला 1 कोटी 36 लाखांचा दंड आकारून सहा महिन्यासाठी स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या आज (शुक्रवार ) झालेल्या बैठकीत मुदतवाढ देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची 14 वी बैठक प्रधान सचिव नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली आज (शुक्रवार ) पार पडली. करीर व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

ऑटोक्लस्टर येथील पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या कार्यालयातून मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त राजेश पाटील, संचालक असलेल्या महापौर उषा ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेनेचे प्रमोद कुटे, मनसेचे सचिन चिखले, केंद्र शासनाच्या प्रतिनिधी ममता बात्रा, पीएमपीएमलचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, राजन पाटील, मुख्य वित्तिय अधिकारी सुनिल भोसले, इन्फ्रास्ट्रकचरचे जनरल मॅनेजर अशोक भालकर, , कार्यकारी अभियंता मनोज सेठीया सभेस उपस्थित होते.

सदर बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवर 30 विषय होते. पॅन सिटी प्रकल्पातंर्गत काम करणारे एल अँड टी (Larsen & Toubro Limited) आणि टेक महिंद्रा (Tech Mahindra Limited) यांना कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाकडील शासन निर्णयानुसार प्रकल्प कामासाठी सहा महिने दंडासह मुदतवाढ देण्यात आली. शहरामध्ये विविध स्मार्ट ऐलिमेंन्टस कार्यान्वित करण्यासाठी Optical Fiber Cable टाकण्याची कार्यवाही चालू असून सदर फायबर केबलव्दारे भविष्यामध्ये उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होणार आहे. त्याकामी Fiber Network Monetization & Operations Committee स्थापन करण्यात आली.

स्मार्ट सिटी च्या म्युनिसिपल ई-क्लासरुम प्रकल्पातंर्गत 105 शाळांमध्ये बसविण्यात आलेले IT Equipment’s चे सिटी नेटर्वकच्या सहाय्याने ICCC येथे संयुक्तपणे इंटीग्रेशन करणार आहे. जेणेकरुन या शाळांना Digital Platform प्राप्त होणार आहे. त्यासाठी 5.64 लाख खर्च होणार आहे. एबीडी प्रकल्पातंर्गत काम करणारे प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट केपीएमजी KPMG Advisory Service Pvt Ltd यांना प्रकल्प कामगिरीच्या आधारावर एक वर्ष मुदतवाढ दिली आहे.

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचे Skill Development प्रकल्पातंर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे Smart Training & Innovation Center (STIC) यांच्याबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील उदयोन्मुख उद्योजकांना मार्गदर्शक ठरणार आहे.

भारत सरकारच्या शहरी विकास मंत्रालयातर्फे सुरु करण्यात आलेल्या India Cycles4 change योजनेमध्ये पिंपरी-चिंचवड शहाराचा समावेश झालेला आहे. ही योजना राबविणेकरीता बीआरटीएस व स्मार्ट सिटी यांच्या योग्य समन्वयाने या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच Non-Motorized Transport Challenge करीता NMT Expert/Cycling Expert आशिक जैन यांना एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.