Pimpri news: शहरातील सर्व अभ्यासिका सुरु करा- मनसेची मागणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा ऑक्टोबरमध्ये होणार आहे

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. या परीक्षेसाठी शहरातील अनेक विद्यार्थी बसले आहेत. त्यांना अभ्यासाठी शहरातील सर्व अभ्यासिका सुरु करण्याची मागणी मनसेचे शहराध्यक्ष, नगरसेवक सचिन चिखले यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात चिखले यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या अभ्यासिका अनलॉकमध्ये देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 11 ऑक्टोबर 2020 रोजी संयुक्त पूर्व परीक्षा 22 नोव्हेंबर 2020 रोजी होणार आहे.

या परीक्षेसाठी पिंपरी-चिंचवड शहरामधुन बरेच विद्यार्थी बसलेले आहेत. या सर्व स्पर्धा परीक्षार्थ्यांनी शहरातील अण्णाभाऊ साठे अभ्यासिका उपलब्ध करुन मिळण्यासाठी माझ्याकडे निवेदन दिले आहे. स्पर्धा परीक्षार्थ्यांना शहरामधील अभ्यासिका सुरु करुन देणे आवश्यक आहे.

स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत कमी वेळ शिल्लक असल्याने शहरातील स्पर्धा परीक्षार्थ्यांची निकड लक्षात घेता त्यांना अभ्यासासाठी शहरातील अण्णाभाऊ साठे अभ्यासिकेसह सर्व अभ्यासिका उपलब्ध करुन द्याव्यात, अशी विनंती चिखले यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.