Pimpri  corona Update:  शहरात नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त; आज 1236 जणांना डिस्चार्ज

633 नवीन रुग्णांची नोंद, 9 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1236 जणांना आज (गुरुवारी) डिस्चार्ज देण्यात आला.

शहरात  विविध भागातील 633 नवीन रुग्णांची  नोंद झाली आहे.   यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 78 हजार 714 झाली आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील रुग्ण वाढीला ब्रेक लागला आहे. ही दिलासायक बाब मानली जात आहे.

शहरातील 5 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 4 अशा 9  रुग्णांचा आज मृत्यू  झाला आहे. त्यात  च-होली, दिघी, पिंपळेगुरव, थेरगाव, चाकण, पाषाण, पुणे कॅम्प, रांजणगाव येथील रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

शहरात आजपर्यंत 78 हजार 714 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 66 हजार 131 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1323 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 493 अशा 1816 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 4139 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.