Pune Corona Update : 1170 रुग्ण कोरोनामुक्त, 42 जणांचा मृत्यू, 1036 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – पुणे शहरात मागील 4 ते 5 दिवसांपासून कोरोना रुग्णांपेक्षा या आजारातून बरे होण्याचे प्रमाण वाढते आहे. गुरुवारी (दि. 1 ऑक्टोबर) तब्बल 1170 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 लाख 26 हजार 430 नागरिकांनी वेळीच उपचार घेऊन कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. आज 5 हजार 260 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1036 नवे रुग्ण आढळले. 42 जणांचा मृत्यू झाला.

913 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 512 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाचे पुणे शहरात 1 लाख 46 हजार 327 रुग्ण झाले आहेत. आतापर्यंत या रोगामुळे 3 हजार 528 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 16 हजार 369 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

पुणे शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकाने आणि मार्केटमध्ये येत असलेले नागरिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, वेळोवेळी परिसर सॅनिटाईज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पुणे शहरात वाढत्या वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी राज्य शासनाकडे 250 व्हेंटिलेटरची मागणी केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जम्बो हॉस्पिटलमध्ये 800 बेडसचे नियोजन करण्यात आले आहे. औंध – बाणेर येथेही 314 बेडसचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. खाजगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्हेंटिलेटर लागणार आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेला पीएम केअर फंडातून 250 व्हेंटिलेटर द्यावे, अशी मागणी आयुक्तांनी राज्य शासनाला दिलेल्या पत्रात केली आहे.

तर, कोरोना रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिव्हिर हे इंजेक्शन अतिशय महत्वपूर्ण आहे. त्याचा काळाबाजार करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.