Pune News: मनपा डॉक्टर, साफसफाई कामगार यांना सोलापुरी चादरी देऊन सन्मान

एमपीसी न्यूज – पंडित दीनदयाळ उपाध्याय व महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक 9 मधील पुणे मनपा डॉक्टर व सर्व साफसफाई कामगार यांना सोलापुरी चादरी देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी भाजपा प्रदेश अध्यक्ष व कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील, भाजपा पुणे शहर सरचिटणीस राजेश पांडे, कोथरूड भाजपा अध्यक्ष पुनीत जोशी, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, नगरसेवक अमोल बालवडकर, भाजपा पुणे शहर ओबीसी आघाडी अध्यक्ष योगेश पिंगळे, माजी महापौर दत्ता  गायकवाड, दिलीप मुरकुटे, बबनराव चाकणकर, लक्ष्मणराव सायकर, मोहन आवटी, प्रकाशतात्या बालवडकर, राहुल कोकाटे, सचिन पाषाणकर, उत्तम जाधव, प्रवीण आमले, प्रवीण शिंदे उपस्थित होते. यावेळी कोविड योध्याचा सन्मान करण्यात आला. डॉ. गणेश ढमाले, डॉ. मीनल पाचूनडे, डॉ. धनंजय शिरोडे, एस. आय. चांदगुडे, लोखंडे,  सांगडे, निकम यांना सन्मानित करण्यात आले.

नगरसेविका ज्योती गणेश कळमकर आणि भाजपा उपाध्यक्ष गणेश कळमकर यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 9 मधील 350 साफसफाई कर्मचारी यांना चादरी वाटप करण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.