Pimpri News : संत संताजी जगनाडे महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

एमपीसी न्यूज – संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पुष्षहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

आज (मंगळवारी, दि. 8) सकाळी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी उपमहापौर केशव घोळवे, पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त श्रावण हर्डीकर, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसेवक राजेंद्र गावडे, मोरेश्वर शेडगे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, पिंपरी चिंचवड तेली समाजाचे पदाधिकारी सुभाष पन्हाळे, डी. डी. चौधरी, अनिल राऊत, सुनिल डोंगरे, विठ्ठल सायकर, शेखर लगड, राजेंद्र चौधरी, वैभव नारळे, श्रीकृष्ण नालट, पी. टी. चौधरी, जितेंद्र चौधरी, सुनिल गासे, अनिल चौधरी, सुभाष चौधरी, सुनिल सहिंद्रे, प्रविण खोडे, भरत चौधरी, योगेश गोमासे, सुनिता राऊत, निलांगी राऊत, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, बाळासाहेब कापसे, अविनाश तिकोणे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

संत संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म मावळ तालुक्यातील सुदुंबरे गावी झाला. संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला होता. त्यामुळे ते हरिभक्तीमध्ये विलीन झाले. पुढे संत संताजी जगनाडे महाराज संत तुकाराम महाराजांच्या चौदा टाळक-यांपैकी एक झाले.

सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.