Pimpri News: पाणीपुरवठ्याच्या हेल्पलाईनवर कमी दाबाने पाणीपुरवठ्याबाबत सर्वाधिक तक्रारी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे. त्या हेल्पलाइन क्रमांकावर एकूण 175 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सर्वाधिक तक्रारी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याबाबत आहेत.

ऐन उन्हाळ्यात शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्या संदर्भात नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यावर तत्काळ कार्यवाही करण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने 7722060999 या क्रमांकावर हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे. ही हेल्पलाइन 24 तास सुरू असते. ही सेवा 24 मार्चला सुरू करण्यात आली. आत्तापर्यंत शहरातील वेगवेगळ्या परिसरातून एकूण 175 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या तक्रारी संबंधित विभागाकडे पाठविल्या जातात. त्यावर तत्काळ कार्यवाही केली जाते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्राधिकरण, निगडीतील सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुध्दीकरण केंद्राऐवजी महापालिका भवनातील एका गटनेत्याच्या दालनात तो कक्ष सुरू करण्यात आला आहे. या हेल्पलाइन सेवेचे कामकाज सकाळ, दुपार आणि रात्र असे तीनही शिफ्टमध्ये सुरू असते. त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.