Chakan News : कंपनीचे शटर उचकटून 66,150 रुपये किंमतीचे साहित्य चोरीला 

एमपीसी न्यूज – कंपनीचे शटर उचकटून 66 हजार 150 रुपये किंमतीचे साहित्य चोरीला गेले आहे. यामध्ये वजनकाटा, सीपीयु, मॉनिटर, शिलाई मशीन, इलेक्ट्रिक शेगडी असे साहित्य आहे. पॉलिमर प्रिसीजन कंपनी, चाकण आळंदी रोड, कुरळी येथे 7 ते 8 एप्रिल या कालावधीत ही घटना घडली. याप्रकरणी तीन जणांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. 

 

दिनेश विका हरका बहादुर (वय 25) भुरा नरेंद्र सिंग (वय 19) आणि विरेंद्र कृष्ण विश्वकर्मा (वय 19) (सर्व रा. खांडेवस्ती, झोपडपट्टी, एम. आय. डी. सी, भोसरी) असे अटक केलल्या आरोपींची नावे आहेत.

सुभाष दुर्गाचरण महापात्रा (वय 45, रा. खराबवाडी, खेड) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पॉलिमर प्रिसीजन कंपनीचे शटर उचकटून 66 हजार 150 रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेले आहे. यामध्ये वजनकाटा,  सीपीयु,  मॉनिटर,  शिलाई मशीन,  इलेक्ट्रिक शेगडी असे साहित्य आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.