Pimpri News: आगामी निवडणुकांमध्ये युवकांवर मोठी जबाबदारी देणार – नाना पटोले

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज (मंगळवारी) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांची मुंबईत सदिच्छा भेट घेतली.

पटोले यांचा महात्मा फुले पगडी, ज्ञानेश्वरी व उपरने देऊन पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी पटोले यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.

_MPC_DIR_MPU_II

त्यावर आगामी काळात युवकांवरच मोठी जबाबदारी देऊन अधिक जोमाने काम करण्यासाठी प्रोत्साहन देणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.

युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, धम्मानंद प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अविनाश चौधरी, शेखर शिंदे आणि मंगेश कदम आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like
Leave a comment