Pimpri news: विविध सामाजिक उपक्रमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा

एमपीसी न्यूज – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा सप्ताह अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहर भाजपने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये रक्तदान शिबिर, सफाई कर्मचारी व आरोग्य निरीक्षक यांचा सत्कार आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहर जिल्हातर्फे प्रभाग क्रमांक 17 मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या हस्ते झाले. पिंपरी येथील पीएसआय ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांनी 24 रक्त पिशव्यांचे संकलन केले.

याप्रसंगी, रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानीय करण्यात आले. दगडोबा चौकातील श्री. ढाके यांच्या जनसंपर्क कार्यालय परिसरात झालेल्या शिबिराचे संयोजन युवा मोर्चाचे भूषण माळी, संदीप पाटील यांनी केले.

तत्पूर्वी, सेवा सप्ताह निमित्ताने प्रभाग 17 मधील सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी, प्रभागात अविरतपणे स्वच्छतेची सेवा देणाऱ्या सफाई कर्मचारी यांचा गुलाबपुष्प, प्रमाणपत्र व मिठाई देऊन सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच, त्यांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी हँड ग्लोज व मास्क वाटप करण्यात आले.

यावेळी, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, शेखर चिंचवडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन शंकर पाटील, नवनाथ वाघमारे, प्रदीप पटेल, शुभम ढाके, कैलास रोटे, वसंत नारखेडे, चेतन महाजन, योगेश महाजन यांनी केले.

भाजपचे ज्येष्ठ नेते विद्यमान नगरसेवक एकनाथ पवार यांच्या वतीने आरोग्य कर्मचा-यांना मास्क, हॅन्ड ग्लोज आणि सॅनीटायझर वाटप करण्यात आले. तसेच पूर्णानगर येथे वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

चिंचवडगावात लाॅकडाऊन काळात ‘कोरोना’ या संसर्गजन्य महामारीचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता स्वच्छतेसाठी अमूल्य योगदान व सेवाकार्यासाठी ‘70 मनपा सफाई कर्मचारी व आरोग्य निरीक्षक’ यांचा सत्कार भारतीय जनता पार्टी प्रभाग 18 च्या वतीने चिंचवडगावातील ‘गोखले हाॅल’ येथे करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी-चिंचवड महानगराचे जिल्हा कार्यवाह विलास लांडगे यांच्या हस्ते सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

’देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘स्वयं-समर्पन, सेवा भाव व प्रखर राष्ट्रभक्ती’ संघाच्या या संस्कारातून घडलेलं एक शक्तीशाली नेतृत्व आहे’, या शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह लांडगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. स्थानिक नगरसेवक व शहर भाजपा सरचिटणीस ॲड.मोरेश्वर शेडगे व चिंचवड-किवळे मंडलाध्यक्ष योगेश चिंचवडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

लोकमान्य रूग्णालयाचे डाॅ. श्रीकृष्ण जोशी, नगरसेवक राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, ब’प्रभाग स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर, महिला मोर्चाच्या अध्यक्षा उज्वला गावडे, सांस्कृतिक आघाडीचे शहराध्यक्ष धनंजय शाळिग्राम, भाजयुमोचे शहर सरचिटणीस, भाजपा सचिव मधुकर बच्चे, शिक्षक आघाडीचे शहराध्यक्ष धनंजय जाधव यांच्यासह प्रशांत आगज्ञान, गणेश गावडे, स्वप्निल देव, पराग जोशी, केदार बावळे, वरद देव, श्रीकांत जोशी, महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षक कांचनकुमार इंदलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक 21 पिंपरी येथे नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना मास्क,हँडग्लोज व वॅपोरायझर मशीन ( वाफेचे मशीन ) चे वाटप करण्यात आले. मंडल सरचिटणीस गणेश ढाकणे,प्रभाग अध्यक्ष जयेश चौधरी, सोनु कदम , संतोष केदारी , किरण शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक 25 वाकड पुनावळे, ताथवडे येथील स्वछता दूत, आरोग्य कर्मचारी शहर उपाध्यक्ष राम वाकडकर आणि महाराष्ट्र प्रदेश महिला कार्यकारिणी सदस्या भारती विनोदे यांच्या हस्ते हॅन्ड ग्लोज, मास्क,सॅनिटायजर वाटप करण्यात आले. अमर भूमकर ,सुरज भुजबळ, अभिषेक विनोदे, हेमंत विनोदे, महेश कुठे,सनी भुजबळ आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.