Pimpri News : कष्टकरी कामगार पंचायत महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी जयश्री एडके-सोनवणे

एमपीसीन्यूज : भोसरी परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या जयश्री एडके-सोनवणे यांची कष्टकरी कामगार पंचायत महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पिंपरी येथील कष्टकरी कामगार पंचायत कार्यालयात कष्टकरी कामगार पंचायतचे संस्थापक -अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये घरकाम महिला सभा अध्यक्षा आशा कांबळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी भीमा कोरेगाव संघर्ष समितीच्या अध्यक्षा अनिता साळवे, साफसफाई कामगार महिला संघटनेच्या नेत्या मधुरा डांगे आदी यावेळी उपस्थित होते.

सध्या गोरगरीब कष्टकरी महिलांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत या महिलांना आधार देण्यासह त्यांचे विविध प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले जातील.  त्याचबरोबर विविध समाजातील महिला आणि मुलींचे शैक्षणिक, सामाजिक आणि नोकरीविषयक प्रश्न सोडविण्यावर भर देण्यात येईल. समाजाच्या शेवटच्या घटकातील महिलेला शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्याला प्राध्यान्य राहील. महिलांना स्वावलंबी बनविणे हाच आपला ध्यास असल्याची भावना जयश्री एडके-सोनवणे यांनी नियुक्तीनंतर व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.