Pimpri News: गाळ्यांच्या नुतनीकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा – गजानन बाबर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 145 गाळे आणि 1224 भाजीमंडई गाळे यांचा करार संपलेला आहे. भूमी आणि जिंदगी विभागाने अद्यापपर्यंत त्याचे नूतनीकरण केलेले नाही. या मिळकती अजूनही भाडेकरू वापरत आहेत. त्यामुळे पालिकेचे उत्पन्न बुडत आहे. या गाळ्यांचे नुतनीकरण करण्यात हलगर्जीपणा करणा-या अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात बाबर यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या स्वतःच्या मालकीच्या मिळकती पैकी बांधीव- 746, आय टू आर -72, एमआयडीसी- 53 ,प्राधिकरण -112 बीआरटीएस पार्किंग 15 आहेत.

महापालिकेने भाडेतत्त्वावर दिलेल्या व्यापारी गाळ्यांची संख्या मनपा वापर -153 ,लिजने -340, भाड्याने -145, शिल्लक गाळे -282, भाजी मंडई भाड्याने -1224 आहेत. तसेच मोकळ्या दोन जागा भाड्याने देण्यासाठी सध्या निविदा प्रसिद्ध केली आहे. महापालिकेने शासकीय कार्यालयासाठी भाड्याने दिलेल्या इमारती- 69 आहेत. त्यात पीएमपीएलसाठी 6 जागा, मेट्रोला 10 जागा देण्यात आल्या आहेत.

महापालिकेने वेळेवर भाड्याने दिलेल्या जागेचा करार तसेच नूतनीकरण करणे आवश्यक आहे. परंतु, माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेच्या आजमितीला 145 गाळे आणि 1224 भाजीमंडई गाळे यांचा करार संपलेला असून यांचे नूतनीकरण झालेले नाही. तसेच या मिळकती अजूनही भाडेकरू वापरत आहेत. ही खूप गंभीर बाब आहे. यावर प्रशासनाचे कोणतेही लक्ष नाही.

यामुळे महापालिकेचे तसेच त्यांच्या मिळणारा महसूल पण बुडत आहे. याला सर्वस्वी जबाबदार अधिकारी आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. स्वतंत्र भूमी आणि जिंदगी विभाग असताना या विभागामार्फत नूतनीकरण किंवा करार होत नाही. ही मोठी गंभीर बाब असून यात काही भ्रष्टाचार तर होत नाही ना, हेही तपासले पाहिजे तसेच याची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही बाबर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.