BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : हमाल पंचायत व कष्टकरी संघटनांच्या वतीने गुरुवारी पोलिस आयुक्त कार्यालयावर मोर्चा

माथाडी माफियासह गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याची मागणी करणार

एमपीसी न्यूज – संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या आधापासून राज्य़ातील हमाल माथाडी चळवळ न्याय हक्कासाठी संघर्ष करत आहे. त्यातून माथाडी हमाल कायद्याची निर्मिती झाली. माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करायचे सोडून माथाडी माफियांचे कारण सांगत या कायद्यालाच नख लावायचा प्रयत्न सरकारने सुरु केला आहे. सरकार व राजकीय पक्षांनीच पोसलेल्या या माफियांचा त्रास केवळ उद्योजकांनाच नसून कष्टक-यांनाही त्यांची गुंडगिरी, हफ्तेखोरी सहन करावी लागते. शासन आणि पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त करावा. या मागणीसाठी पिंपरी पोलीस आयुक्त कार्यालयावर गुरुवारी (दि. 25 जुलैला) हमाल पंचायत व कष्टकरी संघटनांच्यावतीने मोर्चाचे आयोजन केले आहे.

माथाडीमधील गैरप्रकाकरांवर कारवाई करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. संघटनांची नव्हे. माथाडी मंडळ प्रशासनातील काही घटक तोतया माथाडींना नियमांचे मार्गदर्शन करत असतात. ज्या उद्योजकांना माथाडीच्या नावाने त्रास दिला जातो. त्यांची नावे ते जाहिर का करत नाहीत. सरकारला बंदोबस्त कुणाचा करायचाय माथाडी माफियांचा की कायद्यांचा हे सरकारने स्पष्ट करावे.

  • कायदा बदनाम करण्यासाठी माथाडी माफिया संबोधून त्यांच्या खंडणीबहाद्दरीची उदाहरणे दिली जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकार, पोलिसांचे हात कुणी धरले आहेत. त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही. चोर सोडून संन्याशाला बळी देऊ नये, या मागणीसाठी पिंपरी पोलिस आयुक्त कार्यालयावर मोर्चा आहे.
HB_POST_END_FTR-A2

.