Pimpri : बस प्रवासात ज्येष्ठ नागरिकाच्या खिशातील दीड लाख रुपये चोरीला

एमपीसी न्यूज- पीएमपीएमएल बसने प्रवास करत असताना (Pimpri) एका 67 वर्षीय नागरिकाच्या खिशातून तब्बल दीड लाख रुपये चोरीला गेले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि.67) पिंपरी ते चिंचवड स्टेशन चौक या बस प्रवासादरम्यान घडली.

याप्रकरणी बसवराज गुंडाप्पा मुरूमकर (वय 67 पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Shirgaon: मोबाईल टॉवरचे आमिष दाखवून शेतकऱ्याची 54 हजार रुपयांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी हे निगडी कडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बसने प्रवास करत होते. यावेळी त्यांच्या खिशात असलेली दीड लाख रुपयांची रक्कम चोराने खिसा कशाचा तरी साह्याने कापून चोरून नेली. हा प्रकार फिर्यादी च्या लक्षात येताच (Pimpri) त्यांनी तातडीने पिंपरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.