Pimpri : चिंचवडला सोमवारी नृत्य महोत्सवाचे आयोजन

एमपीसी न्यूज – नृत्य तेज अकॅडमीच्यावतीने नृत्य महोत्सवाचे आयोजन सोमवार दि. 29 एप्रिलला आयोजित केले आहे, अशी माहिती नृत्य तेज अकॅडमीच्या संस्थापिका तेजश्री अडिगे यांनी सांगितली.

तेजश्री अडिगे संचालित नृत्य तेज अकॅडमीच्यावतीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नृत्य शैलीचे शिबिर दि. 14 एप्रिलपासून सुरु आहे. यामध्ये 4 ते 40 वयोगटातील 80 विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. या शिबिराचा समारोपाचा कार्यक्रम जागतिक नृत्यदिनानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे होणार आहे.

  • यात सेमी क्लासिकल, सिने बॉलीवूड नृत्य, बेलीनृत्य, कॉन्टेमपरी नृत्य, भारतीय नृत्य असे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नृत्य सादर करणार आहेत.
    या शिबिराकरिता तेजश्री अडिगे, बंटी धारिवाल, मनाली गोवंडे, भानुप्रिया दोशी, बेली डान्सर साक्षी ताजणे यांनी शिबिरार्थींना नृत्याचे प्रशिक्षण दिले. यानिमित्ताने यावेळी बेस्ट युवा कलाकार लावणी नृत्यांगना सुजाता कुंभार, नटरंग अकॅडमीच्या जतिन पांडे यांना बेस्ट नृत्य गुरु पुरस्कार देण्यात येणार आहे. या क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावणा-या बालकलाकार, युवा कलाकार व गुरु यांचा सत्कार होणार आहे. यावेळी लेखक दिग्दर्शक देवेंद्र पेम हे उपस्थित असणार आहे. व कोहिनुर ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजचे उद्योगपती कृष्णकुमार गोयल उपस्थित राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.