Pimpri : पवना धरण ओव्हरफ्लो; वर्षभराची पाण्याची चिंता मिटली

धरणातून 1400 क्यूसेक्सने विसर्ग

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे ( Pimpri) पवना धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे वर्षभराची पाण्याची चिंता मिटली. मंगळवारी रात्रीपासून धरणातून 1400 क्यूसेक्सने विसर्ग करण्यात येत आहे.  त्यामुळे नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Metro News : व्हाटस अपवरून मेट्रोचे तिकीट बुक करताय, सावधान !

पिंपरी-चिंचवडकरांना मावळातील पवना धरणातून पाणी पुरवठा केला जातो. यंदा चारवेळा पवना धरण 100 टक्के भरले आहे. सप्टेंबर अखेरीस धरणात 100 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पुढील वर्षेभर पाण्याची चिंता नाही. मंगळवारपासून जोरदार पाऊस पडत आहे.

पवना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊसचा जोर लक्षात घेता विज निर्मिती गृहाद्वारे पवना नदीमध्ये मंगळवारी रात्री 11:15 पासून 1400 क्यूसेक्सने विसर्ग करण्यात येत आहे.

तसेच धरण क्षेत्रात पावसाचे पुढील प्रमाण पाहता कधीही पवना धरणाच्या सांडव्यावरून पवना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे.

नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत, असे आवाहन पाटबंधारे विभागाने ( Pimpri) केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.