Pimpri: पिंपरीचे महापौर आले महात्मा फुले यांच्या वेशभूषेत ! (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराचे नियोजित महापौर राहुल जाधव हे महात्मा जोतिबा फुले यांचा वेष परिधान करुन महासभेत आले तर, त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत येऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

महापौर व उपमहापौरांची आज (शनिवारी) सकाळी 11 वाजता महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत ही निवड होणार आहे. महापौर व उपमहापौर पदासाठी सत्ताधारी भाजपकडून राहुल जाधव व सचिन चिंचवडे यांनी उमेदवारी अर्ज भरले असून त्यांचा निवड निश्चित आहे. महासभेला येताना नियोजित महापौर राहुल जाधव हे महात्मा जोतिबा फुले यांचा वेश परिधान करुन आल्यामुळे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.