Pimpri: गणेश विर्सजनासाठी घाट सज्ज

घाटावर राहणार सुरक्षा यंत्रणा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने गणेश विर्सजनासाठी 26 ठिकाणी व्यवस्था केली आहे. घाट सज्ज झाले आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी 26 घाटांवर सुरक्षा यंत्रणा ठेवण्यात आली आहे.

किवळेगाव, रावेत घाट, भोंडवेवस्ती, पुनावळेगाव, ताथवडेघाट, वाल्हेकरवाडी, प्राधिकरण तळे, गणेश तलाव, थेरगाव पुल घाट, मोरया गोसावी, केशवनगर, पिंपरी, सुभाषनगर, काळेवाडी, काटे पिंपळे, पिंपळेगुरव, पिंपळेनिलख, वाकड गावठाण, कस्पटेवस्ती, सांगवी, सांगवी दशक्रिया विधी घाट, वेताळबाबा मंदिर घाट, कासारवाडी, फुगेवाडी, बोपखेल, चिखली, मोशीनदी घाटावर गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

घाटांवर विजेच्या दिव्यांची सोय केली आहे. विसर्जनासाठी ठिकठिकाणी छोटे हौद बांधले आहेत. निर्माल्यकुंड ठेवले आहेत. वाहनांची व्यवस्था केली आहे. मूर्तिदानासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे.

अग्निशामक दलाच्या वतीने सर्व घाटांवर सुरक्षारक्षक नेमले आहेत. 50 अग्निशामक दल, 20 होमगार्ड, 25 राज्य अग्निशामक प्रशिक्षणार्थी, क्रीडा विभागाच्या 20 सुरक्षारक्षकांचा समावेश आहे. अग्निशामक विभागाकडून लाइफ जॅकेट, लाइफ रिंग्स, दोरखंड, गळ असे साहित्य सुरक्षा रक्षकांकडे दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.