Pimpri: 215 पीपीई कीट, 2 लाख मास्क, 3 हजार सॅनिटायझर बाटल्यांची खरेदी

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने वैद्यकीय साहित्य सज्जता सुरू केली आहे. महापालिकेकडे पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट कीट अवघी 20 असल्याने 215 नव्याने खरेदी केली जाणार आहेत. याशिवाय 2 लाख मास्क आणि 3 हजार सॅनिटायझर बाटल्यांची खरेदी केली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचे 12 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत. परदेशातून आलेले 613 जण ‘होम क्वॉरंटाईन’मध्ये आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

महापालिकेकडे पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट कीट अवघी 20 असल्याने 215 नव्याने खरेदी केली जाणार आहेत. याशिवाय 2 लाख मास्क आणि 3 हजार सॅनिटायझर बाटल्यांची खरेदी केली जाणार आहे. एन – 95 बनावटीचे 2 हजार तर, वापरून फेकण्याजोग्या 2 लाख मास्कची मागणी करण्यात आली आहे. 3 हजार बाटल्या सॅनिटायझर तर, सोडीयम हायपोक्लोराईड एक हजार बाटल्या खरेदी केल्या जाणार आहेत. 250 खाटांचा विचार करता ही मागणी भांडार विभागाने नोंदविली आहे. त्याची खरेदी प्रक्रिया सुरू झाल्याचे सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.