Pimpri: महापालिका यंदा दीड लाख रोपांची लागवड करणार; आयुक्त हर्डीकर यांची माहिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत यंदा दीड लाख रोपांची लागवड केली जाणार आहे. मिलिटरीच्या जागेवर जास्तीत-जास्त रोपे लावली जाणार आहेत. पिंपरी, दिघी, देहूरोड येथील मिलिटरीच्या जागेवर रोपांची लागवड केली जाईल. त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागेत, शाळांमध्ये अशी दीड लाख रोपांची लागवड केली जाणार असल्याचे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान, वृक्षसंवर्धन विभागामार्फत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी वृक्षारोपण, रोपांची लागवड केली जाते. यंदा दीड लाख रोपे लावण्याचे नियोजन केले आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रोपांच्या लागवडीबाबत पुण्यात आढावा बैठक घेतली. रोपे लागवडीची तयारी करण्याच्या सूचना महापालिका, नगरपालिकांना दिल्या आहेत.

आयुक्त हर्डीकर म्हणाले, ”पिंपरी महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी वृक्षारोपण, रोपांची लागवड केली जाते. यंदा दीड लाख रोपांची लागवड करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. मिलिटरीच्या जागेवर सर्वाधिक रोपांची लागवड केली जाणार आहे. पिंपरी, दिघी, देहूरोड येथील मिलिटरीच्या जागेवर रोपांची लागवड केली जाईल. तसेच रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागेत, स्मशानभूमी, दफनभूमी, मैदाने, शाळा, पाण्याच्या टाकीच्या कडेने, धार्मिक ठिकाणी, मंडई इत्यादी ठिकाणी अशा दीड लाख रोपांची लागवड करण्याचे नियोजन केले आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.