Pimpri: पालिकेचे सेवानिवृत्त प्रशासन अधिकारी हनुमंतराव सातपुते यांचे कोरोनामुळे निधन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सेवानिवृत्त प्रशासन अधिकारी हनुमंतराव शंकरराव सातपुते (वय 73) यांचे काल (मंगळवारी) कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मंदाकिनी सातपुते, मुलगा राहुल  सातपुते, मुलगी अर्चना तावरे, सून, जावाई, नातवंडे असा परिवार आहे.

सातपुते पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत स्थापने पासून कार्यरत होते.  सुरुवातीचे 10 वर्ष स्थायी समिती अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी कामकाज पाहिले. सन 1994 ते 1997 दरम्यान जकात विभागात ते कार्यरत होते. त्यांना प्रशासन अधिकारी म्हणून बढती मिळाली होती. आकाश चिन्ह व परवाना विभागातून प्रशासन अधिकारी या पदावरून ते 2005 साली निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर त्यांनी समाजकार्यात वाहून घेतले होते. आयुष्याच्या शेवट पर्यंत सामाजिक कार्यात सहभागी राहीले.

त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज त्यांचे निधन झाले आहे.

हनुमंत सातपुते अतिशय निगर्वी, सत्य बोलणारे, कष्टाळू होते. त्यांचा स्वभाव मनमिळावू होता. अशा चांगला स्वभाव असणारा आपला जिवाभावाचा सहकारी गेल्यामुळे दु:ख  झाल्याच्या भावना व्यक्त करत  सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी असोसिएशनने त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.