Pimpri Corona Update: शहरात आज 119 नवीन रुग्णांची नोंद; 71 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 119 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 71 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 625 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 65 हजार 545 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 1 हजार 296 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 1 हजार 228 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Maharashtra Bus Accident : महाराष्ट्राची बस कोसळली नर्मदा नदीत; 13 जणांचा मृत्यू

तर, 68 रुग्ण महापालिका रुग्णालयामध्ये दाखल आहे. आज दिवसभरात 1 हजार 875 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 36 लाख 86 हजार 69 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.