HDFC ATM Theft: एचडीएफसी बँकच्या एटीएममध्ये चोरी, 24 तासाच्या आत एटीएम फोडणारी टोळी अटकेत

एमपीसी न्यूज: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालायच्या दरोडा विरोधी पथक व गुन्हे शाखा युनिट 5 ने संयुक्त कामगिरी केली आहे. एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये चोरी केल्यानंतर एटीएम जाळण्याची घटना घडली. पोलिसांनी २४ तासात 6 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एटीएम चोरीचे अन्य 2 गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच, 5.5 लाख रुपयांची रोख रक्कम व चारचाकी वाहन देखील हस्तगत केले आहे.