Pimpri Corona Death: शहरात तीन महिन्यानंतर कोरोना रुग्णाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड शहरात तीन महिन्यानंतर कोरोनामुळे एका महिलेचा आज (गुरुवारी) मृत्यू (Pimpri Corona Death) झाला आहे. कोरोनामुळे शेवटचा मृत्यू मार्च महिन्यात झाला होता.

भोसरीतील 35 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली होती. ही महिला 4 जुलै रोजी महापालिका रुग्णालयात दाखल झाली होती. उपचारादरम्यान आज या महिलेचा मृत्यू (Pimpri Corona Death) झाला. या महिलेला कोरोनासह दुसरे आजारही होते. तीन महिन्यानंतर कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. मृत्यूचे प्रमाण वाढू नये यासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

Nationalist Women’s Congress : घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन

पिंपरी – चिंचवड शहरात 10 मार्च 2020 रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण (Pimpri Corona Death) सापडला होता. पहिल्या लाटेत वयोवृद्ध यांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त होते. दुसऱ्या लाटेत युवकांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त राहिले. तिसऱ्या लाटेत कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली. सुदैवाने रुग्ण गंभीर होण्याचे, मृत्यूचे प्रमाण कमी होते. आता पुन्हा मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. या लाटेतही मृत्यूचे प्रमाण नव्हते. परंतु, आज एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढू नये यासाठी महापालिका प्रशासनाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

उद्धव ठाकरेंचा सोमय्यांकडून माफिया म्हणून उल्लेख, शिंदे गटाने व्यक्त केली नाराजी  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.