Khadakwasala Dam : खडकवासला धरण साखळीत 4.93 टीएमसी पाणीसाठा

एमपीसी न्यूज – खडकवासला धरण साखळीतील (Khadakwasala Dam)  खडकवासला, पानशेत,वरसगाव व टेमघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु आहे. सध्या या चार धरणात मिळून 4.93 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

 

पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार धरणांमध्ये 423 दशलक्ष घनफूट दाबाने पाण्याची आवक सुरु आहे. खडकवासला उजव्या कालव्यातून 50 क्युसेकने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी 8.66 टीएमसी इतका पाणीसाठा होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.