Nationalist Women’s Congress : घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारने घरगुती गॅसच्या किमतीत 50 रुपयांची वाढ केल्याने त्याच्या विरोधात पिंपरी – चिंचवड शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आज (गुरुवारी) आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी (Nationalist Women’s Congress) करण्यात आली.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. माजी नगरसेविका माया बारणे, संगीता ताम्हाणे, कविता खराडे आदी महिला सहभागी झाल्या होत्या.

Pimpri Corona Update: शहरात आज 220 नवीन रुग्णांची नोंद; 195 जणांना डिस्चार्ज

 

कविता आल्हाट म्हणाल्या, केंद्र सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल केले आहे. घरगुती गॅसच्या किमतीत सातत्याने वाढ केली जात आहे. एकावेळी तब्बल 50 रुपयांनी गॅसच्या किमती वाढविल्या (Nationalist Women’s Congress) जातात. दरवाढीमुळे महिलांचे नियोजन कोलमडले आहे. गॅसच्या किमती 1 हजाराच्या पुढे गेल्या आहेत. मोदी सरकारचे हेच का अच्छे दिन असा सवालही त्यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.