Pimpri Corona Update: शहरात आज 220 नवीन रुग्णांची नोंद; 195 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड शहराच्या विविध भागातील 220 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 195 जणांना (Pimpri Corona Update)  डिस्चार्ज देण्यात आला.

Statistical Survey : शहरात राष्ट्रीय सांख्यिकी सर्वेक्षण सुरू

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 624 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 63 हजार 553 जणांना आजपर्यंत कोरोनाची (Pimpri Corona Update) लागण झाली.

सध्या 1 हजार 458 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 1 हजार 414 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

तर, 44 रुग्ण महापालिका  रुग्णालयामध्ये दाखल आहे. आज दिवसभरात 1 हजार 801 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 36 लाख 65 हजार 359 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.