Pimpri : रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे शिक्षकांना प्रशिक्षण

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे पिंपरी, नेहरुनगर येथील वसंतदादा पाटील स्कूल मधील शिक्षकांचा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. या प्रशिक्षणामध्ये 40 शिक्षक सहभागी झाले होते. आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षकांचे महत्व, क्लास रुम, मॅनेजमेंट यावर मार्गदर्शन करण्यात आले.

वसंतदादा पाटील स्कूल मध्ये मंगळवारी (दि.20)हे शिक्षकांचे प्रशिक्षण पार पडले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष सदाशिव काळे, शाळेचे अध्यक्ष तथा माजी महापौर हनुमंत भोसले, रोटरीचे प्रकल्प अधिकारी संतोष भालेकर, साक्षरता अधिकारी अर्जुन मीराणी, माजी अध्यक्ष अनिल शर्मा, सुवर्णा काळे, डिस्ट्रीक्ट अधिकारी उज्वला जोशी, शाळेच्या मुख्याध्यापिका काळे उपस्थित होते. इंडियन करिअर एज्युकेशन डेव्हलपमेंट काऊंसीलतर्फे प्रसिद्ध ट्रेनर शैलजा व जॉनील यांनी प्राथमिक व माध्यमीक शाळेच्या 40 शिक्षकांना प्रशिक्षण दिले.

प्रास्ताविकात अध्यक्ष सदाशिव काळे म्हणाले,”रोटरी क्लबने साक्षरतेवर अधिक भर दिला आहे. प्रौढ शिक्षण, शिशू संगोपन, विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास, शिक्षक प्रशिक्षण, हॅपी स्कूल असे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. रोटरी क्लबच्या कार्याची, विविध प्रकल्पांची माहिती’ त्यांनी दिली. हनुमंत भोसले म्हणाले, ‘रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे शैक्षणिक क्षेत्रात चांगले कार्य सुरु आहे. शाळेला अनेक क्षेत्रामध्ये भरपूर मदत केली आहे”. संतोष भालेकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.