Pune : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे पैगंबर जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणूक

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे आज,बुधवारी सकाळी ईद – ए – मिलाद, पैगंबर जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणूक आयोजित करण्यात आली होती.

या मिरवणुकीत प्रेषित महमद पैगंबर यांच्या मानवतावादी, शिक्षण विषयक, पर्यावरणविषयक शिकवणुकीचे संदेश देणारे फलक हाती घेतले होते. संस्थेच्या 30 शैक्षणिक आस्थापनातून 5 हजार विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक , विश्वस्त, संचालक तसेच ‘अवामी महाज ‘ या सामाजिक संस्थेचे सदस्य, सहभागी झाले.

आझम कॅम्पस ( पुणे कॅम्प )येथून सकाळी साडेआठ वाजता अभिवादन मिरवणुकीला संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार यांच्या हस्ते प्रारंभ झाला. मिरवणुकीत बग्गीत अरबी वेशातील मुले बसली होती.विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या. मोदिखाना, नाना पेठ, भवानी पेठ परिसरातून ही मिरवणूक निघाली.

या अभिवादन मिरवणुकीचे हे 14 वे वर्ष होते. संस्थेतर्फे दरवर्षी छ. शिवाजी महाराज, महात्मा गांधी, म.फुले, डॉ.आंबेडकर तसेच प्रेषित महमद पैगंबर या महामानवांना अभिवादन करण्यासाठी अभिवादन मिरवणुका काढल्या जातात. आणि मानवतावादी संदेश दिले जातात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.