Pimpri : घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेनिमित्त पिंपरी युवासेनेने पिंजून काढला पिंपरी विधानसभा मतदारसंघ

एमपीसी न्यूज – गणेशोत्सवामुळे संपूर्ण शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. याच अनुषंगाने पिंपरी युवासेनेतर्फे घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित करून नागरिकांमधील कलागुणांना वाव देऊन चांगले व्यासपीठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला आहे. घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेनिमित्त पिंपरी युवासेनेने पिंपरी विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे.

पिंपरी युवा सेनेच्या ह्या उपक्रमामुळे युवासेनेने नागरिकांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. ह्या स्पर्धामध्ये जास्त प्रमाणात नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. निगडी, प्राधिकरण, आकुर्डी, चिंचवड, संततुकाराम नगर, बोपखेल या परिसरात पिंपरी युवासेनेने नागरिकाच्या घरी जाऊन स्वत: निरीक्षण करत आहे.

अशा उपक्रमाच्या माध्यमातून युवक व युवतींना आपल्या युवासेनेबाबत प्रबोधन करून व आदित्य साहेब ठाकरे यांचे विचार युवकांपर्यंत पिंपरी युवासेना पोहचवत आहोत. हा उपक्रम व संकल्पना युवासेना जिल्हा समन्वयक जितेंद्र ननावरे, प्रतीक्षा घुले, निलेश हाके यांनी मांडली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.